Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र बंदची हाक अवैध !

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा ; बंद पुकारण्याबाबत संभ्रमावस्था

मुंबई ः बदलापूर येथील घटनेचा राज्यभरात तीव्र संताप असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्यभरात करण्यात येत आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार

प्रकाश आंबेडकर आज लोकसभेबाबत भूमिका जाहीर करणार ?
पुण्यातील आश्रमात 2 हजार कोटींचा घोटाळा
महावितरणमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

मुंबई ः बदलापूर येथील घटनेचा राज्यभरात तीव्र संताप असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्यभरात करण्यात येत आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. यावेळी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बंदची हाक अवैध असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतरही कुणी बंद पुकारला तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोर्टाने या प्रकरणी दिला आहे.
बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर होणारा बंद सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत होईल. त्यात सर्वांनी आपसातील मतभेद विसरुन सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. मात्र उच्च न्यायालयाने हा बंद अवैध असल्याचे म्हटल्यानंतर या बंदविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बदलापुरातील आंदोलकांना दोरखंडाने बांधून नेले. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे सरकारने मागे घ्यायला हवे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. नराधमांच्या पाठीराख्यांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, तर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वांनी बंद पाळायला हवा. दुकानदारांनाही मुली आहेत, त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हायला हवे. लोकल आणि बससेवा बंद ठेवायला हव्या, असे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, यंत्रणांनी वेळेवर कारवाई केली असती, तर बदलापुरात उद्रेक व्यक्त झालाच नसता. महिलांना केवळ त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. बदलापुरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला हवे अशी आमची मागणी आहे, तर सरकारने उद्याचा बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर जनता येणार्‍या निवडणुकीत तुमचा फज्जा उडवेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधार्‍यांना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भाजप पदाधिकार्‍यांनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे. त्यांनाही मुली आहेत. पोलिस महासंचालकांनाही राज्याची लाडकी बहिण होण्याची संधी आहे. त्यांनी पोलिसांना मध्ये पडू नये असे सांगायला हवे. हा बंद म्हणजे बंद असणार आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी दुपारी दोनपर्यंत आपली दुकाने बंद ठेवायला हवीत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

विकृती विरूद्ध संस्कृतीसाठी बंद ः उद्धव ठाकरे – महाराष्ट्र बंद हा राजकीय कारणासाठी नसून, हा बंद विकृती विरूद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत.  कोणत्याही  राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्यावतीने शनिवारी बंद आम्ही करत आहे. सर्व भेद विसरून या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे. सरकारला काहीही म्हणून देत मी जनतेच्या बाजूने आहे. जनतेला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. यंत्रणा वेळेत हलली असती तर हा उद्रेक झाला नसता. आता उच्च न्यायालयाने काल थोबडवले तेही राजकारणाने प्रेरित होते का? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

कुणालाही बंद पुकारण्याचा अधिकार नाही – राज्यात कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. त्यानंतरही कुणी बंद पुकारण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंदवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना मविआ आपल्या बंदवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS