Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट ओळखपत्र बनविणा़र्‍यांचा धंदा तेजीत

सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांचा गंभीर आरोप

बेलापूर प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणुका व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदा

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर
लस न घेतलेल्यांना पेट्रोल व रेशन नाही : पालक मंत्री मुश्रीफ
कोपरगाव शहरात तीन मुलांना कुत्र्यांनी घेतला चावा

बेलापूर प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणुका व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल. परंतु काही देश विघातक शक्तींकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी केला आहे.
बनावट ओळखपत्रामुळे पारदर्शी मतदानाच्या मूळ हेतु लाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.. या प्रकाराची खातर जमा करण्यासाठी बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधार कार्ड बनवून घेऊन या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी या ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. याखेरीज बोगस मतदान टाळणे केवळ अशक्य असल्याची चिंता सुनील मुथा यांनी व्यक्त केली आहे. या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचेही बर्‍याच प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मार्फत हे ओळखपत्र बनवणार्‍यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. तरी निवडणूक आयोगाने सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याकरता आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात अशी मागणी सुनील मुथा यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात केली आहे.

COMMENTS