Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एका मुलीसोबत साखरपुडा करुन, दुसरीसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात

कल्याण प्रतिनिधी - डोंबिवलीत एका मुलीसोबत साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात  वरात काढल्य

फ्री मध्ये Netflix, Prime Video बघू इच्छित असाल तर जिओ चा बेस्ट ऑफर
केज तहसीलवर रिपाइं (ए) च्या संघर्ष मोर्चा
खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात l DAINIK LOKMNTHAN

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवलीत एका मुलीसोबत साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात  वरात काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डोंबिवली मधिल विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही बलात्कार व फसवणुकीचा  गुन्हा दाखल केला आहे. आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  ‘सिद्धार्थ शिंदे’  असे या आरोपी नवरदेवाचे नाव आहे. 4 वर्षा पूर्वी पीडित मुलीला एका लग्ना दरम्यान भेटत तिच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी साखरपुडा करत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेऊन तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले.  अशी माहिती पोलिसांनी दिली.  कलम ३७६ , ४२० या गुन्ह्या अंर्तगत गुन्हा दाखल केला गेला आहे.  

 – डोंबिलीत राहणार ‘सिद्धार्थ शिंदे’ या तरुणाला गेले 4 वर्षा पूर्वी नातेवाईकांच्या लग्नात पीडित तरुणी दिसली व त्याला तिथेच तिच्या वर प्रेम झाले. तिच्याशी लग्न करण्यासाठी  सिद्धार्थने आई-वडिलांना सांगून , पीडित मुलीशी चार वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर चार वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवत होता.  मात्र तिच्याशी लग्न न करत  एका दुसऱ्याच मुलीशी त्याने लग्न केले. याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत  ‘सिद्धार्थ व त्याच्या आई-वडिलांच्या’ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी दुसरी सोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढत सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध सुरू आहे. 

COMMENTS