Homeताज्या बातम्यादेश

लग्नाच्या जेवणात पनीर नसल्यानं वऱ्हाड्यांमध्ये राडा

लग्न म्हटल्यावर सर्वांचे मानपान आलेच. अनेक घरांमध्ये लग्नात आत्या, मामा किंवा घरातील अन्य मोठे जावई रुसल्याचं ऐकायला मिळतं. मानपान न मिळाल्याने व

पुणे शहरातील कचरा प्रश्‍न पेटला
स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला
कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासून करावे

लग्न म्हटल्यावर सर्वांचे मानपान आलेच. अनेक घरांमध्ये लग्नात आत्या, मामा किंवा घरातील अन्य मोठे जावई रुसल्याचं ऐकायला मिळतं. मानपान न मिळाल्याने व्यक्ती लग्नात भांडणं देखील करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे लग्नातील जेवणावरून भांडत आहेत. लग्नातील गोड पंचपक्वान असलेलं जेवण सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठी घरात एक लग्नपत्रिका आली तरी अनेक जण आपल्या ओळखीच्या बऱ्याच व्यक्तींना लग्नाला घेऊन जातात आणि जेवणावर ताव मारतात. लग्नात पनीरची भाजी आता कॉमन झाली आहे. सर्वच लग्नांमध्ये जेवणात पनीरची भाजी असते. अशात व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे पनीरच्या भाजीसाठी भांडत आहेत.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नासाठी जेवणाच्या मंडपात नवरा आणि नवरी दोन्हीकडील माणसं जमली आहेत. जेवताना आमच्या भाजीत पनीर नाही म्हणून या पाहुण्यांमध्ये आधी बाचाबाची होते. काही वेळातच त्यांच्यातल्या या भांडणांना हाणामारीचं स्वरुप मिळतं. वधू आणि वर दोन्ही बाजूच्या व्यक्ती एकमेकांना मारहाण करू लागतात.या मारहाणीत कोण हॉलमधील खुर्च्या तोडत आहे तर कोण पडदे फाडत आहे. हाणामारीत मंडपाची पूर्णता वाट लागलीये. झालेल्या घटनेमुळे नवरा नवरी दोघेही घाबरलेत. तर मंडपात खुर्च्यांसह दोन्ही बाजूच्या माणसांनी एकमेकांना धक्काबुक्की आणि मारहाण केलीये. खतरनाक राड्याचा हा व्हिडीओ @Ghar ke kalesh या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय.

COMMENTS