Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विषारी फेसानं कोंडतोय इंद्रायणी नदीचा श्वास

पुणे प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. राज्यभरातून आळंदी या तीर्थक्ष

Ahmednagar : गोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल | LOKNews24
ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी
मानखुर्दमध्ये वृद्धेवर बलात्कार

पुणे प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. राज्यभरातून आळंदी या तीर्थक्षेत्रात येणारे लाखो भाविक आणि वारकरी मोठ्या भक्तीभावाने इंद्रायणी नदीचे पाणी पित असतात. मात्र आता इंद्रायणी नदीची दूरावस्था झाली म्हणणे वावगे ठरणार नाही. इंद्रायणी नदी पात्रात केमिकल युक्त पाणी सोडले जात असल्याने आता पाणी पूर्णपणे दुषित झाले आहे. सर्वत्र नदीच्या पाण्यावर केमिकलचा विषयुक्त फेसच फेस दिसत आहे. त्यामुळे नदीला हिम नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इंद्रायणीचे गेले काही वर्ष पावित्र हे धोक्यात आले आहे. आळंदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मते, उद्योगांमधून सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले पाणी, रसायने आणि विषारी कचरा आणि लाँड्रीमधून प्रक्रिया न केलेले पाणी हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. अनेक वर्षापासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे थेट पंतप्रधान मोदीनां लिहीले पत्र. या गंभीर स्थितीमुळे पर्यावरणवादी चिंतेत आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले आहे. तसंच यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि नगरविकास विभागाला पत्रेही पाठवली आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत इंद्रायणी तसंच पवना नद्यांचे पावित्र पुन्हा मुळ रुपात येईल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, नदीतील फेसाची समस्याही तीव्र झाली आहे. याबाबतीत महापालिकेने कारवाई केली नसून प्रदूषण रोखण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रशासन कधी जागे होणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

COMMENTS