नागपूर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक होत ठराव मांडण्याची मागणी केली. कर्नाटक सरकारने यापूर्वीच महाराष
नागपूर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक होत ठराव मांडण्याची मागणी केली. कर्नाटक सरकारने यापूर्वीच महाराष्ट्राविरोधात ठराव पास केला असून, एक इंचही जमीन राज्याला देणार नसल्याची भूमिका घेतली. यावरुन राज्याच्या विधीमंडळात मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज मंगळवारी कर्नाटक विरोधात ठराव मांडणार असल्याची ग्वाही दिली.
हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी शिंदे सारकरवर जोरदार टीका केली. हे सरकार केंद्राचे बटिक असून राज्याच्या अस्मितेची वाट लागत असताना केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर केला होता. असे असतांनाही राज्याने कर्नाटक सरकार विरोधात एकही कारवाई केली नाही. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज देखील जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. कर्नाटक विरोधात किमान ठराव तरी मांडला जावा अशी मागणी विरोधकांनी केली. यानंतर अखेर सीमाप्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत असतांना तर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबद्दल माहिती दिली, त्यानुसार कर्नाटक विरोधातील ठराव आज सभागृहात मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दिल्ली दौर्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी शिंदे म्हणाले, सध्या सीमा वाद हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल आहे. यावर सुनावणी सुरू आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत.
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेश घोषित करा ः उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानपरिषदेत हजेरी लावली आहे. सीमावादाच्या मुद्य्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. सभागृहात बोलातना उद्धव ठाकरे म्हणाले, जर ठराव करणार असाल तर हाच ठराव झाला पाहिजे, की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार हा तिकडे थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने ताब्यात घेऊन, आता केंद्र सरकार पालक म्हणून वागेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. याशिवाय, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र हा अत्याचर भोगत आलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची संयम सुटत चालला आहे, धीर खचत चालला आहे. पण आज नाहीतर कधीच नाही या एक जिद्दीने आपण जर का उभा राहिलो नाही. तर मला वाटते नुसती ही बडबड करण्यात अर्थ नाही. असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवले.
COMMENTS