Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरूणीचा आढळला डोके, हात, पाय नसलेला मृतदेह

पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रातील घटना

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असतांनाच, शहरातील मुळा-मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्

टोमॅटो साँग सोशल मीडियावर व्हायरल
सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल
भीषण अपघात ! चिमुकल्या मुलीचा मृत्यू

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असतांनाच, शहरातील मुळा-मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शन मागे वॉटर फ्रंट सोसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला एका तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह असलेल्या 18 ते 30 वयोगटातील तरुणीचे डोके, हात, पाय अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याचे दृष्टीने धारदार हत्याराने कापून तिचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे दिसून आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, चंदननगर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच राज्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने राज्यातील वातावरण तणावाचे होत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली असून तातडीने अशा प्रकरणाची देखील घेत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील या घटनेची देखील चर्चा राज्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असून, आरोपींचा शोध देखील सुरु करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीत दुथडी भरुन वाहत आहे. परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विर्सग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागल्यानंतर खराडी भागात बांधकाम ठिकाणावर काम करत असलेल्या काही मजुरांना नदीपात्रात एक संशयास्पद मृतदेह दिसून आला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मृत महिला अज्ञात ठिकाणी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन जीवे ठार मारुन तिचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीराचे धडापासून शिर, दोन्ही हात खांद्या पासून, दोन्ही पाय खुब्यापासून कोणत्यातरी धारदार हत्याराने कापले. धड कोठेतरी मुळा मुठा नदीपात्रात टाकून दिले असून ते टाकुन दिलेले धड जेनी लाईट कन्सट्रक्शनचे मागे मुळा-मुठा नदीत मिळून आले आहे. सदर महिला रंगाने सावळी असून तिच्या उजव्या काखेच्या खाली काळा व्रण आहे, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.

COMMENTS