डिक्कीतून नेला बाळाचा मृतदेह

Homeताज्या बातम्यादेश

डिक्कीतून नेला बाळाचा मृतदेह

बाईकच्या बॉक्स डिक्कीतून नवजात बाळाचा मृतदेह नेला

 मध्यप्रदेश प्रतिनिधी - नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांवर दुर्दैवी वेळ ओढावली. एका नवजात बाळाचा मृतदेह   वडिलांनी अक्षरशः बाईकच्या ब

डॉ.शशांक कराळे यांनी रुग्णांप्रती सेवाभाव जपावा-आ.प्रकाश सोळंके
खावटी अनुदान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचवा :ॲड.के.सी.पाडवी यांचे निर्देश
कृष्णा बँकेला 12 कोटी 65 लाख रूपयांचा नफा : डॉ. अतुल भोसले

 मध्यप्रदेश प्रतिनिधी – नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांवर दुर्दैवी वेळ ओढावली. एका नवजात बाळाचा मृतदेह   वडिलांनी अक्षरशः बाईकच्या बॉक्स डिक्कीतून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या  कार्यालयात नेला. आपल्याला रुग्णावाहिका नाकारल्यानं नवजात बाळाच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ही घटना मध्य प्रदेशमध्ये  घडली. मंगळवारी घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत बाळाच्या वडिलांनी केली.

COMMENTS