Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा तालुक्यातील वरप गावात गुरुवारी दुपारी एका सुटकेसमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक

भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; 30 दिवसांत हजर न झाल्यास मालमत्ता होणार जप्त
अहमदनगर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाकरीता शासन कटीबध्द : पालकमंत्री हसन मुश्रीफ

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा तालुक्यातील वरप गावात गुरुवारी दुपारी एका सुटकेसमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरप गावातील रहिवाशांना निर्जन भागात सुटकेस आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता या सुटकेसमध्ये 65 ते 70 वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

COMMENTS