Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रशियाला जाताना मिळालेले आशीर्वाद बळ देणारे : श्रेयस कासले

श्रीरामपूर : कोणतेही काम करताना, कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करताना आपल्या माणसांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मौलिक ठरतात, मी रशियाला डॉक्टर होण्यास

LokNews24 l आत्महत्येपुर्वी दीपाली यांचे आणखी एक पत्र, महिलेवर गंभीर आरोप
रंधा धबधबा परिसरात घरफोडी
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर

श्रीरामपूर : कोणतेही काम करताना, कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करताना आपल्या माणसांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मौलिक ठरतात, मी रशियाला डॉक्टर होण्यासाठी जाताना मोठ्यांचे मिळालेले आशीर्वाद परदेशात अडअडचणीतून मार्ग काढण्यासाठी बळ देणारे ठरतील, असे भावपूर्ण उद्गार श्रेयस कासले याने काढले.
येथील रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रा.पुरुषोत्तम भागुराम कासले यांचे चिरंजीव रशियाला एम.बी. बी.एस शिक्षण घेण्यासाठी रशियाला प्रवास करण्यासाठी निघाले. प्रसंगी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ शंकरराव गागरे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे आदिंनी केलेल्या सत्कारप्रसंगी श्रेयस कासले बोलत होते. प्राचार्य शेळके म्हणाले, आमचे लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील खुंटेगाव येथील कासले परिवार धार्मिक, राजकीय, सामाजिक, कृषी इत्यादी क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेला आहे. निवृत्तीनाथ कासले हे कित्येक वर्षे सरपंच होते. त्यांचे चिरंजीव भागूराम कासले यांनी तीच सेवेची परंपरा सुरु ठेवली. या परिवारातील प्रा. पुरुषोत्तम कासले उच्च शिक्षित झाले. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी विविध शाखेत चांगले काम केले, आता त्यांचे चिरंजीव श्रेयस रशियाला जात आहे, ही पुण्याईची आणि ज्ञानाची आदर्श परंपरा जपली आहे. त्यांना शुभेच्छा देताना मनापासून अभिनंदन आहे. याप्रसंगी विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, ड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान, स्वाध्याय परिवारातर्फे सन्मानचिन्ह, शाल, पुस्तके, बुके, भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ. उपाध्ये, प्रा. पुरुषोत्तम कासले यांनी मनोगत व्यक्त केले. नियोजन सौ. शिवगीता कासले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. श्रेयस कासले यांनी आपल्या आठवणी सांगत आभार मानले.

COMMENTS