Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीत ’तू-तू मैं-मैं’

70 हजार कोटींचा निकाल अद्याप बाकी ; बावनकुळेंनी अजित पवारांना डिवचलेपुणे ः राज्यात महानगरपालिकांचे राजकीय वातावरण तापत असतांनाच आणि विरोधकांकडून ब

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकले
जातीय सलोखा बिघडवणे चुकीचे ः अजित पवार

70 हजार कोटींचा निकाल अद्याप बाकी ; बावनकुळेंनी अजित पवारांना डिवचले
पुणे ः राज्यात महानगरपालिकांचे राजकीय वातावरण तापत असतांनाच आणि विरोधकांकडून बिनविरोधचा मुद्दा आक्रमक रीतीने मांडला जात असतांनाच दुसरीकडे महायुतीमध्ये वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मागची पाने चाळली तर दादांना बोलता येणार नाही. तसेच 70 हजार कोटींचा निकाल अद्याप लागलेला नाही, अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना डिवचले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजपने लक्ष घालण्यास सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमधील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधताना, माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे सर्वांना माहित आहे. मात्र, ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो आहे. असे म्हटले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे भाजपची काहीशी कोंडी झाली होती. या विधानानंतर भाजपच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काही अभिमानास्पद नाही. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे न्यायालयात काय होईल, त्यावर पुढची दिशा ठरेल. अजित दादा हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीत मनभेद निर्माण होतील असे वागू नये, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. बावनकुळे यांनी अजित पवारांना जुन्या प्रकरणांची आठवण करून देत थेट इशारा दिला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमेकांविरुद्ध न बोलण्याचे ठरले असतानाही अजित पवार असे का बोलले? याची मला कल्पना नाही. पण त्यांनी असे बोलायला नको होते, असे बावनकुळेंनी म्हटले आहे.

सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या: शेलार
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून आरसा दाखवला आहे. तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य असतील, तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करू, अशा अत्यंत कडक शब्दांत शेलारांनी अजित पवारांना ठणकावले आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार यांनी उपरोक्त इशारा दिलेला आहे.

COMMENTS