Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुद्धांचा जन्म या पृथ्वीतलावर होणे सर्वात दुर्लभ; पु.भिक्खु डॉ.सुमनवन्नो महाथेरो

बीड प्रतिनिधी - अडीज हजार वर्षांपूर्वी बुद्धांसारख्या दुर्लभ महापुरुषांचे दर्शन या पृथ्वीतलावर वैशाख पौर्णिमेला जगाला झाले. तथागत बुद्धांनी आयुष

धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  
पीएम आवास योजनेअंतर्गत ८० लाख घरे बांधणार
अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत

बीड प्रतिनिधी – अडीज हजार वर्षांपूर्वी बुद्धांसारख्या दुर्लभ महापुरुषांचे दर्शन या पृथ्वीतलावर वैशाख पौर्णिमेला जगाला झाले. तथागत बुद्धांनी आयुष्यभर लोकांना मानवतावादी विचारांची शिकवन या जगाला दिली आहे. बुद्धांची शिकवन हे समता,शांती,स्वातंत्र्य ,बंधुता,न्याय ,प्रेम अशा थोर विचाराने भरलेली होती. या जगात सर्वसामान्य खुप लोक जन्माला येतात आणी मरुन जातात. परंतु बुद्धांसारख्या थोर महापुरुषांचा जन्म या जगात होणे सर्वात दुर्लभ आहे, असे प्रतिपादन पु.भिक्खु डॉ.सुमनवन्नो महाथेरो,चंन्द्रपुर यांनी केले.
प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीडच्या वतीने धम्मभुमी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी ता.जि.बीड येथे थायलंड येथुन प्राप्त झालेल्या बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा व तथागत सम्यक सम्बुध्द यांचा 2567 वा बुद्ध जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख धम्मदेसना देताना पु.भिक्खु डॉ.सुमनवन्नो महाथेरो आपले मत व्यक्त करत होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, पु.भिक्खु  डॉ.उपगुप्त  महाथेरो पुर्णा, पु.भिक्खु डॉ.इन्दवंस्स महाथेरो कुशीनगर, संस्थेचे सचिव, पु. भिक्खु धम्मशील थेरो उपस्थित होते व त्यांनीही धम्मदेसना दिली. तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन माजी न्यायमुर्ती सी.एल. थुल साहेब, बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, नंदकुमार ठाकुर साहेब, प्रादेशिक उपसंचालक समाज कल्याण विभाग, नाशीकचे भगवान विर साहेब, ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष, संदिपजी उपरे, एपीआय अमन सिरसठ साहेब, पिंपळनेर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक- भारती साहेब सह आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलताना पु.भिक्खु डॉ.सुमनवन्नो महाथेरो म्हणाले की, आज बुद्धांच्या या विचारांची गरज संपुर्ण जगाला आहे.जगाचे कल्याण हे फक्त बुद्धांच्या विचारातच आहे.हे बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकररांनी जाणले.व अशा थोर महापुरुषांचे दर्शन समस्त बहुजन समाजाला दिले.आशा थोर पुरुषांचा धम्म इथल्या रंजल्या गांजल्या लोकांना देऊन त्यांच्या जिवनाचे कल्याण केले.म्हणुन आपण महान आणि श्रेष्ठ धम्माचे आचरण करुन आपले जिवन सुखी केले पाहिजे. आपल्या जिवनातील वाईट परिस्थिती आपल्याला  घालवायची असेल तर आपण महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे. ज्या गोष्टीने समाजाचे उद्धान होईल, परिवर्तन होईल अशा गोष्टी समाजाने कराव्यात, केवळ मनोरंजनात वेळ घालु नये. मनोरंजनातुन मुक्त समाज झाला पाहिजे असे वक्तव्य पुज्य भंतेजीनी आपल्या धम्मदेशनेमध्ये व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्या सञात बीड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य धम्ममीरवणुक संपन्न झाली.अवघ्या शहराचे लक्ष या धम्ममिरवणुकीने वेधुन घेतले होते.त्यानंतर दुसर्‍या सञात पुज्य भिक्खु संघाच्या हस्ते शिवणी येथील ऐतिहासिक बोधीवृक्षाची पुजा वंदना करण्यात आली. व त्यानंतर पु.भिक्खु संघाच्या वतीने स्मृतिशेष नारायण विर यांच्या स्मरणार्थ थायलंड येथुन प्राप्त बुद्धरुपाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन करुण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमा प्रसंगी आलेल्या सर्व उपासक- उपासिकांना संस्थेचे उपाध्यक्ष, प्रा.प्रदिप रोडे यांनी भोजनदान व उषाताई सखाराम उजगरे यांनी खिरदान दिले. कार्यक्रमास याप्रसंगी पत्रकार, इंजिनीयर, वकील, डॉक्टर,शासकीय निम शासकीय कर्मचारी, उद्योजक आदिंसह बीड जिल्हा, शहर व परिसरातुन हजारो लोकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.अंकुश कोरडे, प्राचार्य डॉ. पांडुरंग सुतार यांनी केले, प्रास्तावीक संस्थेचे संचालक- प्रा.राम गायकवाड यांनी केले व आभार प्रा.प्रदिप रोडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचे सर्व  सभासद, तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचारी व शिवणी ग्रामस्थांनी कथक परिश्रम घेतले.

COMMENTS