Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्या आईने आपल्या 39 दिवसाच्या बाळाला चौदाव्या मजल्यावरून फेकले

मुंबई प्रतिनिधी - मुंबईच्या मुलुंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका इमारतीत राहणाऱ्या आईनेच आपल्या पोटच्या बाळाला 14 व्या म

तब्बल 12 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
मुख्यमंत्री साहेब शेती परवडत नाही , वाईन विक्रीची परवानगी द्या| LOKNews24
तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा – बी.व्ही.मस्के

मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या मुलुंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका इमारतीत राहणाऱ्या आईनेच आपल्या पोटच्या बाळाला 14 व्या मजल्यावरून फेकले आहे. या प्रकरणात बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आईने मानसिक तणावाखाली हे कृत्य केल्याचे समजले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना मुलुंडच्या नीलकंठ नावाच्या इमारतीची आहे. येथे एका महिलेने मानसिक तणावात येऊन आपल्या बाळाला इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली फेकले.

काही दिवसांपूर्वी या महिलेच्या वडिलांचे निधन झाले. हा धक्का तिला सहन झाला नाही आणि तिला मानसिक तणाव झाला. तिच्या वडीलांच्या मृत्यूचा तिच्या मनावर परिणाम झाला. तिच्या बळावर वडिलांचे खूप प्रेम होते. बाळाला पाहून तिला वडिलांची आठवण येत असे. तिने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उठली आणि अवघ्या 39 दिवसांच्या  बाळाला घराच्या खिडकीतून 14 व्या मजल्यावरून फेकून दिले.  बाळ खिडकीतून इमारतीच्या खाली असलेल्या एका दुकानावर पडले. इमारतीच्या एका व्यक्तीने दुकानाच्या छतावर बाळ खाली पडताना पहिले. त्याने पोलिसाना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळाच्या मृतदेहाला ताब्यात घेतले.असून महिलेच्या विरोधात तक्रार नोंदली असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

COMMENTS