Homeताज्या बातम्यादेश

जन्मदात्या आईनेच 9 महिन्यांच्या लेकीला 800 रुपयांना विकलं

ओडिशा - सर्व सोंग घेता येते पण पैशाचं सोगं करता येत नाही, अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो.

मनपाचे प्रस्तावित रुग्णालय…शाळेच्या आरक्षित जागेवर
नालंदामुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल
ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक चिंतेत

ओडिशा – सर्व सोंग घेता येते पण पैशाचं सोगं करता येत नाही, अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ओडिशात आर्थिक विवंचनेने त्रस्त असलेल्या आदिवासी समाजातील महिलेने आपल्या 9 महिन्यांच्या मुलीला विकल्याची घटना समोर आली आहे. मयूरभंज जिल्ह्यात एका महिलेने अवघ्या 800 रुपयांना आपली मुलगी विकली. पोलिसांनी मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणात मुलीची आई, तिला विकत घेणारे जोडपे आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुलीची आई सांगते की ती आपल्या मुलीची योग्य काळजी घेऊ शकली नाही. यामुळेच त्यांनी मुलीला शेजारच्या गावात विकण्याचा निर्णय घेतला. करमी मुर्मू असे आईचे नाव आहे. त्यांना एकूण 2 मुली आहेत. त्यातून त्याने आपल्या 9 महिन्यांच्या लिसा नावाच्या मुलीला विकले. तिच्या पतीचे नाव मुशू मुर्मू आहे. करमीच्या या कृत्याबद्दल पतीला माहिती नव्हती. वास्तविक मुशू तामिळनाडूमध्ये काम करत होता. गावात एकटीच राहणारी पत्नी दोन्ही मुलींचा सांभाळ करत होती. बऱ्याच दिवसांनी नवरा ओडिशातील त्याच्या घरी परतला तेव्हा त्याला एकच मुलगी दिसली. यावर पत्नीने योग्य उत्तर दिले नाही. त्यानंतर स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

COMMENTS