Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवारी (२८ मे) रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी कर

बचत गटाच्या उत्पादनांनी ‘एकवीरा मार्केट’ गजबजले
डॉ. शशांक कुलकर्णी नीती आयोगाचे कृषी सल्लागार
राखी मूर्ख नाही, फक्त तिची मुलांबद्दलची निवड वाईट” | LOKNews24

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवारी (२८ मे) रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वित्त व लेखा विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक लक्ष्मण वसावे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.    

याप्रसंगी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक हेमंत भामरे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता भूषण पाटील व सागर खंबाईत, उपव्यवस्थापक सदू जाधव व बसप्पा पांढरे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS