Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी 

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच

पंजाबमध्ये आप स्वतंत्र लढणार ः केजरीवाल
ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
आ.ससाने कडून ग्रामीण भागातील रस्त्याची पाहणी

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी प्रस्ताविकात सावित्रीबाई फुले जयंतीचे महत्व विशद केले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे त्यांचा आदर्श प्रत्येकाने डोळ्यापुढे ठेवावा असे प्रतिपादन केले, प्रत्येक महिलेत जिल्हा परिषदेचे कर्मचारी सुनिता पिंगळे, माधवी गांगुर्डे कनिष्ठ प्रशासन अधिकारी भूषण भार्गवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनाविषयी माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील,  महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS