राहुरी ः राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामस्थांच्या सहभागातून 3 मे ते 14 मे 2024 या काळात होणार्या बाल संस्कार शिबिराला मोठ्या उत्साहात न
राहुरी ः राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामस्थांच्या सहभागातून 3 मे ते 14 मे 2024 या काळात होणार्या बाल संस्कार शिबिराला मोठ्या उत्साहात नुकताच प्रारंभ झाला. टाकळीमिया येथील समस्त ग्रामस्थांच्या सहभागातून अंजनी ऍग्रो इंडस्ट्रीजच्या (यज्ञ स्थळ) जागेत या शिबिराचे उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाले. आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व टाकळी येथील उदय महाराज घोडके यांच्या अधिपत्याखाली हे शिबीर सध्या सुरू आहे. शिबिरात सहभागी बाल विद्यार्थ्यांना नंदकुमार जुंदरे (अभ्यास, प्रसाद बानकर (भारतीय संस्कृती), शंभू गिरी महाराज (मातृ-पितृ उपकार), डॉ. भास्कर कुलकर्णी (पर्यावरण), सारिका ढोकणे (कुटुंब व्यवस्था), बाबासाहेब तोडमल (स्वातंत्र्यवीर सावरकर), प्रसाद मैड (देशभक्तीपर गीते), विजयराव ढोले (अभंग), डॉ. डी. डी. जाधव (शारीरिक आरोग्य), प्रा. महेश शेळके (दैनंदिन जीवनातील देशभक्ती), वैद्य किशोर खेडेकर (सामाजिक आरोग्य), प्रा. संदीप मगर (वाचन महत्व), अनिल देशपांडे (भ्रमणध्वनी एक समस्या), प्रवीण पैठणकर (छत्रपती संभाजी महाराज), यांचे बौद्धिक सत्र होणार आहेत. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी शिबिरास भेट देऊन शिब्रार्थी विद्यार्थ्यांची भेट घेऊन माहिती घेतली. टाकळीमिया पंचकोशीसह राहुरी, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील शंभरहून अधिक बाल विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले आहेत.
COMMENTS