उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले

हल्लेखोरांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

पुणे : माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली आहे. या घटनेनंतर राज्यातील राज

शिवसेनेला हादरे न संपणारे
शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्येl LokNews24
निवडणूक झाल्यावर पुण्यात शिवसेनेचा विजयी मेळावा घेणार… संजय राऊत

पुणे : माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जशास तसे उत्तर दिले जाईल, असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तर आता केवळ गाडी फोडली, पुढे तोंडही फोडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा शिवेसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांनी दिला आहे. शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत काल पुणे दौर्‍यावर असताना शिवसैनिकांनी कात्रज भागात त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना 3 दिवसाची म्हणजे 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीमध्ये शिवसेना शहरप्रमुखाचा सामावेश आहे. हल्ला प्रकरणात अटक केल्यावर आरोपीवर 353, 120, 307, 332 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्याव्यतिरिक्त 3 जणांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी काही जणांना अटक करून त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते.

COMMENTS