Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर सातारा जिल्ह्यातील वातावरण तापले

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या हालचालींना गती आली आहे. लवकरच शासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता
औंधच्या श्री यमाई देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा
उपोषण करताच पाच तक्रारींचा झाला निपटारा; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ; ग्रामसेवकाचे निलंबन

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या हालचालींना गती आली आहे. लवकरच शासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बँकेवर संचालक म्हणून जाण्यास इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आजी-माजी पदाधिकारी ना. पवार यांची भेट घेणार असल्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरु आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे बँकेची निवडणूक सर्वसमावेश व बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पक्षांतर्गत वाद निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे पॅनेल पडू नये, यासाठीची रणनीती राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते ठरवत आहेत. जिल्हा बँकेत कायम तेच तेच लोक संचालक पदावर आहेत. पण दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील पदाधिकार्‍यांचा कोणीही विचार करत नसल्याचे चित्र आहे. किमान राखीव व संस्थांच्या मतदार संघातून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा काहीजणांनी व्यक्त केली आहे. यामध्ये काही जुन्या जाणत्या व निष्ठावंत आजी-माजी पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर पक्षांतील कोणाला संधी देण्याऐवजी राष्ट्रवादीतील इच्छुकांना संधी मिळवी, असा मतप्रवाह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांमध्ये सुरु आहे.
हे सर्व इच्छुक आजी-माजी पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौर्‍यादरम्यान भेट घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना ना. अजित पवार काय सूचना देतील याकडे लक्ष लागले आहे. गत निवडणूकीत काही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या इच्छुकांना स्थानिक नेत्यांनी थांबविले आहे. त्यामुळे अशा नेत्यांचा अजित पवार समाचार घेणार का? त्यांना पाठीशी घालणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावेळी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष घालणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे जास्तीत-जास्त पदाधिकारी संचालक मंडळात येतील, यासाठी ना. पवार कोणत्याप्रकारे नियोजन करणार आहेत. जिल्हा बँकेचे काही ज्येष्ठ संचालक निवडणूक बिनविरोध करण्याच्या विचारात आहेत. असे झालेच तर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना संधी देण्यासाठी कसे नियोजन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS