Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सद्गुणी, सेवाभावी माणसांच्या सहवासामुळे जीवनाचे सोने होते

प्रा. मिलिंदराव सुफले यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर ः  मानवी संकृती आणि सृष्टीजीवन हे चांगल्या माणसांच्या समर्पणातून, योगदानातून आकाराला आले आहे. मी सदैव अड्याळ टेकडीचे गीताचार्य संत तुक

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी
जल जीवन मिशन योजनेसाठी आमरण उपोषण
अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

श्रीरामपूर ः  मानवी संकृती आणि सृष्टीजीवन हे चांगल्या माणसांच्या समर्पणातून, योगदानातून आकाराला आले आहे. मी सदैव अड्याळ टेकडीचे गीताचार्य संत तुकारामदादा, डॉ. बाबा आमटे, शेगावचे शिवशंकरभाऊ पाटील आदी आदर्श माणसांच्या सहवासात राहिलो म्हणून जीवनात स्थिर झालो, सद्गुणी, सेवाभावी माणसांच्या सहवासामुळे जीवनाचे सोने होते, असे भावपूर्ण उद्गार बह्मपुरी येथील इंजिनिअर प्रा. मिलिंदराव सुफले यांनी काढले.
येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे प्रा. मिलिंदराव सुफले यांच्या परिवाराचा सन्मान आणि महामानवांचे संस्कारविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रा. सुफले बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल, फुले, पुस्तके देऊन सत्कार केला. यावेळी ब्रह्मपुरीच्या सौ. कल्याणी सुफले, अहिल्यानगरचे सेवाभावी व्यक्तिमत्त्व राजकुमार ढुमणे, रेखा ढुमणे आदिंच्या आदर्श कार्याबद्दल सत्कार करण्यात आले. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी शेगाव, आनंदवन स्थळ आणि संस्कार आठवणी सांगितल्या. चांगली माणसे लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे, ती जीवनात जपली असल्याचे सांगून श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीची वाटचाल विशद केली. प्रा. मिलिंदकुमार सुफले यांनी श्रीमती शशिकलाताई शिंदे दर्शनभेट, विद्यानिकेतनच्या महादेव मळा व ऐनतपूर परिसरातील अड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित शैक्षणिक संकुल पाहून धन्य झाल्याचे सांगून रावसाहेब शिंदे यांच्या आठवणी सांगितल्या. श्रीरामपूर ही पुण्यशील भूमी असून येथील माणसे एकदिलाने आणि सेवावृत्तीने गावाचा नावलौकिक सर्वत्र करीत असल्याचे समाधान व्यक्त केले. सुखदेव सुकळे यांनी चंद्रपूर ही जन्मभूमी आणि श्रीरामपूर कर्मभूमी आपल्या समर्पित, भक्तीभावाने पुनित केली आहे, असे सांगून सर्वांचे ग्रामगीता, कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य हे ग्रंथ आणि शाल,बुके देऊन सत्कार केले. राजकुमार ढुमणे, सौ.रेखा ढुमणे, सौ. कल्याणी सुफले यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेखा बुरकुले, सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले. प्राचार्य शेळके यांनी डॉ. बाबा आमटे, शिवशंकरभाऊ पाटील, अ‍ॅड रावसाहेब शिंदे, सुमनभाई शाह, भाऊसाहेब थोरात यांच्या आठवणी सांगत अशा माणसांमुळेच श्रीरामपूर भूमी आपली मानली, असे सांगून सुकळेसर, उपाध्येसर यांचा जीवन संघर्ष व सेवाभाव सांगितला. सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.

COMMENTS