Homeताज्या बातम्यादेश

कृषी क्षेत्र वाढीचा दर 4.18 टक्के नोंदवला

नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-24 सादर केला.आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे की छोट्या

अवकाळी पावसाचा फटका, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस राहणार बंद
यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट
महाबळेश्‍वर-पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : खा. श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत जोरदार मागणी

नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-24 सादर केला.आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे की छोट्या शेतकर्‍यांनी उच्च मूल्याच्या पिकांच्या शेतीकडे वळणे आवश्यक आहे.छोट्या शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले की ते उत्पादित वस्तूंची मागणी करतील, ज्यामुळे उत्पादन क्षेत्रात क्रांती होईल असे सर्वेक्षणात म्हटले आहे. भारतीय कृषी क्षेत्र सुमारे 42.3 टक्के लोकसंख्येला उपजीविका पुरवते आणि सध्याच्या किमतीनुसार देशाच्या जीडीपीत याचा 18.2 टक्के वाटा आहे. हे क्षेत्र कायम उत्साही असते. या क्षेत्राने गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक 4.18 टक्के वाढ नोंदवली आहे आणि 2023-24 च्या हंगामी अंदाजानुसार, कृषी विकास दर 1.4 टक्के राहिला यावरून हे स्पष्ट होते असे आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे.

COMMENTS