Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

पात्र मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे ः बाळासाहेब कोळेकर

शिर्डी ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सव

खा. वाकचौरे यांनी घेतली माजी मंत्री गडाख यांची भेट
राहुरीत शनी जयंती उत्सवाचे आयोजन
अहमदनगरमध्ये दहा दिवसांत 2 हजार 740 वीज जोडण्या

शिर्डी ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे; आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी , कोपरगाव , श्रीरामपूर व नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
शिर्डी लोकसभेच्या 1708 मतदान केंद्रावर 13 मे रोजी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर,  सुरक्षा व्यवस्था, उष्माघातापासून संरक्षणासाठी  औषधे, बैठक व्यवस्था, सावलीसाठी मंडप उभारणी, तसेच पाळणाघर आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे. पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रावरील छतांवर गवताचे पाचट टाकण्यात येणार आहे. वादळी वार्‍याने हे पाचट उडून जावू नये. यासाठी यांची बांधणी पक्की करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी-वारा व पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मतदान साहित्याबरोबर मेडीकल कीट ही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मतदान अधिकारी- कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची निवासाची व माफक दरात भोजनाची मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. निवासावेळी कर्मचार्‍यांची व्यवस्थित झोप व्हावी, यासाठी मच्छर पासून संरक्षणासाठी डास कीट दिले जाणार आहेत. फिरते वैद्यकीय पथके कार्यरत राहणार आहेत. अशी माहिती कोळेकर यांनी दिली. शिर्डी लोकसभांतर्गत विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणार्‍या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता 156 सेक्टरनिहाय 312 रूट तयार करण्यात आलेले आहेत. 211 एसटी बसेस, 387 जीप, 51 मिनी बस व 9 कुझर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर अहमदनगर येथे ईव्हीएम मशिन घेऊन जाण्यासाठी 18 कंटेनर वाहन असणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रांची सिलिंग पूर्ण झाली आहे. अभिरूप मतदान प्रक्रियाही यशस्वी झाली आहे. 1708 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी 1 कंट्रोल युनिट, 2 बॅलेट युनिट, 1 व्हीव्हीपॅट यंत्रांची  उपलब्धता आहे. एकूण कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट यंत्रांच्या 20 टक्के प्रमाणात व एकूण व्हीव्हीपॅट यंत्रांच्या 30 टक्के प्रमाणात यंत्रे राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदान यंत्रांत ऐनवेळी काही तांत्रिक बिघाड झाल्यास यंत्रे तात्काळ दुरूस्त करण्यासाठी प्रत्येक तहसीलमध्ये 2 अभियंता नियुक्त करण्यात आले आहेत.

9400 अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती – शिर्डीतील 1708 मतदान केंद्रांसाठी 8 हजार 530 मतदान अधिकारी, कर्मचारी व 860 राखीव कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे . 50 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. सेक्टर अधिकार्‍याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी क्षेत्रीय दंडाधिकारी दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर शस्त्रधारी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.

शिर्डी मतदारसंघात 16 लाख 77 हजार मतदार – शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रात 16 लाख 77 हजार 335 मतदार असून यामध्ये 8 लाख 64 हजार 573 पुरूष मतदार, 8 लाख 12 हजार 684 महिला मतदार आणि 78 तृतीयपंथी मतदार आहेत.

पन्नास टक्के मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग – शिर्डी लोकसभेतील 1708 मतदान केंद्रांपैकी 854 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील 12 मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह कॉस्टींग पाहता येणार आहे. त्याद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष असणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पण मतदान केंद्राचे लाईव्ह कॉस्टींगद्वारे हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

COMMENTS