Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

सातारा ः पुण्यातील वादग्रस्त बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्‍वर येथील पंचतारांकित एमपीजी क्लबच्या अनधिकृत बांधकामावर सातारा जिल्हा प्रशासनाने श

कॅन्टोमेंट बोर्डाला साडेचार कोटी रुपयाचे निधी मंजूर
बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई
सरकारी नोकऱ्या अन् खाजगी भरती !

सातारा ः पुण्यातील वादग्रस्त बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्‍वर येथील पंचतारांकित एमपीजी क्लबच्या अनधिकृत बांधकामावर सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी बुलडोझर फिरवत जमीनदोस्त केले. अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत 15 खोल्या जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईमुळं महाबळेश्‍वरमध्ये अनधिकृत बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. महाबळेश्‍वरमधील विशाल अग्रवाल यांचे अनधिकृत हॉटेल काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सील केले होते. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार प्रशासनाने हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. सकाळी दहापर्यंत प्रशासनाने हॉटेलच्या अनधिकृत 15 खोल्यांचे बांधकाम तोडकामाची कारवाई पूर्ण केली. यावेळी प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बिल्डर विशाल अग्रवालच्या हॉटेलमध्ये अनियमितता असल्यास कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने तपासणी केली असता हॉटेलच्या बारमध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आले होते, त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली.

COMMENTS