Homeताज्या बातम्यामनोरंजन

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

मुलांचा आनंद केला द्विगुणित

सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या अनाथाश्रमाला भेट दिली. या मालिकेतील प्रमुख नायिका गौरी म्हण

डॉ. एम. एस. हरणे यांना भारत सरकारचे पेटंट बहाल
लोकनेते खासदार निलेशजी लंके च्या निवडीने दहिगावने गटात जल्लोष
 अनैतिक संबंधातून माय लेकीवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न       

सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या अनाथाश्रमाला भेट दिली. या मालिकेतील प्रमुख नायिका गौरी म्हणजेच सीमा कुलकर्णी हिने आश्रमातील मुलांसाठी खास स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून, खाऊ घातलं . तसेच त्यांनी येथील मुलांना उपयोगी भेटवस्तू दिल्या. या अनोख्या उपक्रमामुळे येथील मुलांना खूप आनंद झाला आणि एक रोजचा साधा असा दिवस आनंददायक उत्सवात बदलला. त्यानंतर अभिनेता रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांनी नाशिकच्या पवित्र काळाराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी अभिनेत्री सीमा म्हणाली ,‘सावली होईन सुखाची’ मध्ये साकारत असलेली गौरीची भूमिका ही माझ्या स्वतःच्या खूप जवळ जाणारी आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून प्रगल्भ करणारी, आणि आत्मिक समाधान देणारी अशी ही भूमिका आहे. आजवर केलेल्या सर्व भूमिकांमध्ये माझी सर्वात आवडती भूमिका आहे. आज येथे येऊन या गोड गोड लहान बाळांसाठी स्वतःच्या हाताने खाऊ बनवण्यात आणि त्यांना खाऊ घालण्यात जे सुख मिळालं त्याला तोड नाही. त्यांचा आनंदी, तृप्त चेहरा पाहून मन भरून आलं. 

‘सावली होईन सुखाची’ही मालिका आपल्या सर्वांच्याच चांगल्या परिचयाची आहे. गेल्या एक वर्षांपासून रुद्र जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न शेवटी फळाला आला. रुद्र ने गौरीचं मन जिंकलं आणि तिने लग्नाला होकार दिला. मालिकेमध्ये गौरी तिच्या आश्रमातल्या मुलांसाठी खूप कष्ट घेते. त्यांचं चांगलं संगोपन करते. त्यात रुद्र सुद्धा तिच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे. म्हणून आयुष्यातला हा नवीन प्रवास त्यांनी या मुलांच्या शुभेच्छा घेऊन, त्यांना काही भेट वस्तू देऊन सुरु केली. गौरी – रुद्रच्या नवीन प्रवासाची सुरूवात २४ ते ३१ ऑगस्टला रात्री ९ वाजता सन मराठीवर पाहायला मिळणारं आहे.

COMMENTS