बीड प्रतिनिधी - बीडमधून एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. यात एका माजी कृषी अधिकाऱ्याच्या कृत्याने सगळ्यांनाच हादरवलं आहे. शेजाऱ्याच्या घरील क

बीड प्रतिनिधी – बीडमधून एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. यात एका माजी कृषी अधिकाऱ्याच्या कृत्याने सगळ्यांनाच हादरवलं आहे. शेजाऱ्याच्या घरील कुत्रा भुंकल्याने भडकलेल्या माजी कृषी अधिकाऱ्याने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. माझ्यावर जो भुंकतो त्याला मी ठोकतो असं म्हणत माजी कृषी अधिकाऱ्याने रागाच्या भरात कुत्र्यावरच गोळ्या झाडल्या. हा गंभीर प्रकार बीडच्या परळी वैजनाथ शहरातून समोर आला आहे. कुत्र्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडणाऱ्या माजी अधिकाऱ्याचं नावं रामराज कारभारी घोळवे असं आहे. या घटनेत बंदुकीची गोळी लागून कुत्रा जागेवर ठार झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. याप्रकरणी या माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS