Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीचा फोन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

नागपूर प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. या प्रकऱणी एका आरोपीला पोलि

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक !
राज्यात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हितासाठी काम केलं तर ग्राहक देखील सहकार्य करेल – प्रताप हेगाडे

नागपूर प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. या प्रकऱणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री  नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला मध्यरात्री दोन वाजता एका व्यक्तीने फोन केला. त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेब बॉम्ब ठेवल्याचे सांगत धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने फडणवीसांच्या घरी घेत बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस सुरक्षा वाढवली. तसेच फोन करणाऱ्यालाही अटक केली. फोन करणारा व्यक्ती हा नागपूरच्या कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS