Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसाला चावा घेणारा आरोपीला अखेर अटक

मुंबई ः संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जाणार्‍या 20 वर्षीय तरूणाला हटकले असता त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात घडल

नाशिकमध्ये भरवस्तीत टोळीयुद्धातून गोळीबार
वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यात ऑनलाइन क्लासमध्ये अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ l DAINIK LOKMNTHAN

मुंबई ः संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जाणार्‍या 20 वर्षीय तरूणाला हटकले असता त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात घडला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरूणाला अटक केली.
तक्रारदार पोलिस शिपाई विशाल सोनजे विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते सोमवारी रात्री कर्त्यव्यावर असताना विक्रोळी टागोर नगर परिसरात एक तरूण संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जात असताना त्यांना दिसला. सोनजे यांनी तरूणाला थांबवले व सळ्यांबाबत विचारले असता तो संतापला. त्याने सोनजे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सोनजे यांनी अखेर त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने सोनजे यांच्या हाताचा चावा घेतला. तसेच तेथे उपस्थित रिक्षाचालक लियाकत याच्याही डाव्या हातालाही तो चावला. याप्रकरणानंतर तरुणाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याचे नाव मल्लेश कांबळे (20) असल्याचे समजले. तो विक्रोळी कन्नमवारनगर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, तैनात पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी मंगळवारी कांबळेला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात गेल्यावर्षी विक्रोळी पोलीस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सोनजे व लियाकत दोघांनाही विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS