Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन चौगुले हल्ल्यातील आरोपींना अटक करावी

अन्यथा शिर्डी बंदची विविध संघटनांची हाक

शिर्डी ः कॉग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीना तात्काळ अटक करावी या म

सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर
उत्तरपत्रिकेसह प्रश्‍नपत्रिका आली चक्क मोबाईलवर… | DAINIK LOKMNTHAN
५G मोबाईल टॉवरमुळे कर्करोगाचा धोका… टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध…

शिर्डी ः कॉग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन शिर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. सकल मराठा समाज, सत्यशोधक लहुजी सेना, बहुजनवादी संघटना शिर्डी व महाविकास आघाडीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
 या निवेदनात म्हटले आहे की, 2 जानेवारी रोजी आश्‍वी येथून शिर्डीकडे येत असताना लोणी येथे या दोघांवर झालेल्या हल्ल्याची पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करुन कठोर कारवाईची करावी, हा हल्ला राजकीय द्वेषातून झाला असून शिर्डी शहरात याचे तीव्र पडसाद उमटले आहे. प्राणघातक हल्ला झाला तरीही हल्लेखोर मोकाट फिरत आहे, या प्रकरणातील दोषीवर त्वरित कारवाई व्हावी तसेच सुरेश आरणे यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्याने अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल होवून दोघांवरही झालेल्या प्राणघातक हल्ल्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा असे निवेदन पोलिसांना देण्यात आले. या निवेदनात भरत मोरे, शिवाजी इंगळे, दिपक चौगुले, उमेश गायकवाड, सुनील आरणे, सोनु बर्डे, अनिल आसणे, रविंद्र इंगळे, मंगेश साळवे, संतोष वाघमारे, मदन मोकाटे, आकाश निरगुडे, बालाजी गोर्डे, निलेश तारडे, बापू वायकर, दत्ता वैद्य, आकाश वांगणे, तुकाराम शिंदे, अनिल आरणे, ज्ञानेश्‍वर हातांगळे, शिवाजी भोंडगे, काळू आरणे, राजेंद्र साळुंके, उमेश बर्डे, सविता आसणे, सुरेखा गुंजाळ, सागर जाधव, भूषण आसणे, बाबासाहेब गवारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

COMMENTS