Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संचित रजेवरील फरार आरोपीला पुण्यातून तीन वर्षांनंतर उचलले

लातूर प्रतिनिधी - खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संचित रजेवरील आरोपी हा फरार झाला होता. दरम्यान, त्याला लातुरातील विवेकानंद चौक

सौर ऊर्जेसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडयाने घेणार
FILMY MASALA : चुकीचा सल्ला देऊ नका’ म्हणत फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर lLokNews24
चक्रीवादळाची आपबीती ..11 तासांचा ‘तो’ संघर्ष | सुपरफास्ट २४ | LokNews24 |

लातूर प्रतिनिधी – खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संचित रजेवरील आरोपी हा फरार झाला होता. दरम्यान, त्याला लातुरातील विवेकानंद चौक ठाण्याच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील शिवाजीनगर ठाण्यात 2014 मध्ये दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी परमेश्वर शंकर जाधव (37, रा. एलआयसी कॉलनी, सहयोगनगर, लातूर) हा 2020 मध्ये चार आठवड्यांच्या संचित रजेवर हर्सूल कारागृहातून बाहेर पडला होता. दरम्यान, संचित रजा संपल्यावर तो कारागृहात दाखल न होता फरार झाला होता. याबाबत कारागृह पोलिसांच्या फिर्यादवरून विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो पुण्यात असल्याची माहिती पोलिस पथकाला खबर्‍याने दिली. या माहितीच्या आधारे पोलिस पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी आरोपीचा माग काढत तीन वर्षांनंतर अटक केली. लातूर न्यायालयात हजर करून, पुन्हा त्याला पोलिसांनी हर्सूल कारागृहात पाठविले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस उपनिरीक्षक कांबळे, सहायक फौजदार विलास फुलारी, दिनेश हवा, नलवाड यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS