Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाल्या आहेत. आता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपड

Sanjay Raut : लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय?
वारीतील रोकडोबाबा यात्रा चाळीस वर्षानंतर उत्साहात साजरी
पुण्यात क्रेडीट कार्ड काढून देण्याचे बहाण्याने चार लाखाचा गंडा

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाल्या आहेत. आता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. दहावी आणि बारावीचे निकाल पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या असून दहावीच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या. आता बोर्ड एक्झाम झाल्या आहेत आणि बोर्ड परीक्षा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना चाहूल लागली आहे ती निकालाची.   मिळालेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचे निकाल पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहेत. याबाबत मात्र बोर्डाकडून अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल जून अखेरपर्यंत लागतील अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता येत्या एका महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येणार आहे. maharesult.nic.in आणि mahahsscboard.in या दोन वेबसाईटवर जाऊन दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, परीक्षार्थी आपला रिझल्ट पाहू शकणार आहेत.

COMMENTS