Homeताज्या बातम्यादेश

सात दहशतवाद्यांनी घडवला ’तो’ हल्ला

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात एका वाहनाला लागलेल्या आगीत 5 जवानांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र वाहनाला लागलेली आग ही वीज पडू

अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…
छत्र बोरगाव शाळेची प्रवेश दिंडी निघाली उत्साहात
धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्यात

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात एका वाहनाला लागलेल्या आगीत 5 जवानांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र वाहनाला लागलेली आग ही वीज पडून लागली की, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लागली यात स्पष्टता नव्हती. मात्र शुक्रवारी भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार यामागे दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती समोर आली असून सात दहशतवाद्यांनी मिळून हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे.
लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तैय्यबा या पाकिस्तान पुरस्कृत दोन्ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात कार्यरत आहेत. या संघटनांच्या मदतीने पूंचमध्ये गुरुवारी लष्कराच्या वाहनावर हल्ला घडवून आणण्यात आला. यामध्ये पाच जवान शहीद झाले. ’जैश’चा पाठिंबा असणारा दहशतवादी गट पिपल्स अँटि फॅसिस्ट फ्रन्टकडून या हल्ल्याची जबाबदारी देखील घेण्यात आली आहे. या घटनेत खरच दहशतवादी गटांचा सहभाग होता का? याचा तपास गुप्तचर यंत्रणांकडून सुरु आहे. या तपासातून धक्कादायक बाब समोर आली की, ’जैश’ आणि ’तैय्यबा’च्या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरमधील विविध भागातून एकत्र यायला सांगितले होते. त्यानंतर ते पूंछमध्ये ज्या ठिकाणी लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये लपण्यास सांगण्यात आले होते.

COMMENTS