Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव भांगेंच्या कृपाशीवार्दा मुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचा गलथान कारभार गेल्या काही दिवसांपासून आम्ही जनतेसमोर मांडत असतांना, या विभागाचा प्रमुखच जर वादाच्या फेर्‍

सामाजिक न्याय दिन ‘अन्याय दिन’ म्हणून साजरा करावा का ?
श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल
सचिव भांगेंच्या अतिरेकी शिफारशीमुळे बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योतीच्या स्वायत्तेवर येणार गदा

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचा गलथान कारभार गेल्या काही दिवसांपासून आम्ही जनतेसमोर मांडत असतांना, या विभागाचा प्रमुखच जर वादाच्या फेर्‍यात सापडत असेल तर इतर अधिकार्‍यांचे बोलायलाच नको. सचिव सुमंत भांगे यांच्या कणाहीन नेतृत्वामुळे या विभागावर त्यांची पकड राहिलेली नसून, या विभागात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वारे यांनी समतादूतांच्या कार्यशाळेत बेभान डान्स केल्याचे समोर आले आहे. यावेळी वक्ते वसंत हंकारे देखील उपस्थित होते.
बार्टीच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असतांना, बार्टीच्या महासंचालकांकडून राधेशाम शाम गोविंद, बोलो, हरि गोपाल बोलो या गाण्यावर बेभान डान्स केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून आलेल्या समतादूतांना देखील बेभान डान्स करायला लावला. विशेष म्हणजे समतादूतांच्या या कार्यशाळेचा उद्देश समतादूतांना भारतीय संविधानांचा अभ्यास आणि महामानवांच्या विचाराने त्यांना प्रेरित करून प्रशिक्षित करणे हा होता. मात्र सचिव भांगे यांचा कोणताही वचक नसल्यामुळे या विभागात मनमानी सुरू असून, त्याचाच कित्ता महासंचालकांनी गिरवत, बेभान डान्स केल्याचे समोर आल्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी झाडाझडती घेण्याची गरज- राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सामाजिक न्याय विभाग असल्याने त्यांना या विभागाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. परिणामी सचिव सुमंत भांगे यांची सध्या या विभागात चांगलीच चलती आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या कुरणात सगळेच अधिकारी चांगलेच चरतांना दिसून येत आहे. त्यामुळे या विभागावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स त्याचाच परिपाक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी या विभागातील तक्रारीची गंभीर दखल घेवून या विभागाची झाडाझडती घेण्याची गरज आहे.  

सचिव म्हणून ठरले निष्प्रभ  –सचिव म्हणून रुजू झाल्यापासून सुमंत भांगे यांनी एकदाही विभागाच्या अधिनस्त असणार्‍या शाळा, वसतीगृह किंवा कार्यालयाला भेट दिलेली नाही. ते सदानकदा मंत्रालयात सुरक्षारक्षकांच्या सुरक्षेत दलालांच्या गराड्यात व्यस्त असतात. विभागाच्या कामकाजात, समस्यांमध्ये लक्ष घालण्याऐवजी त्यांचे सर्व लक्ष बदल्यांमध्ये दलाली वसुलीमध्ये असते. विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेणे, झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन अखर्चित निधी कसा वेळेत खर्च होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना तसे प्रयत्न करताना सचिव सुमंत भांगे दिसत नाहीत. सचिव सुमंत भांगे यांच्या विरोधात त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल सातत्याने वृत्तपत्रांमधून बातम्या येत असून अनु. जाती-नवबौध्द समाजामध्ये त्यांच्या बद्दल असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तरी शासनाची तात्काळ इतरत्र उचलबांगडी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच सुमंत भांगे हे सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणून निष्प्रभ ठरले आहेत.

COMMENTS