नांदेड । प्रतिनिधीनांदेड शहरात ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात आता मोठी चुरस निर्माण झाली असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रचारात सरस ठरत असल्याचे

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड शहरात ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात आता मोठी चुरस निर्माण झाली असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रचारात सरस ठरत असल्याचे चित्र आहे. खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या सक्रिय सहभागानंतर मुंबईहून आलेले उपनेते संपर्क बबनराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या प्रचार पदयात्रेमुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग क्रमांक 4 मधील ठाकरे सेनेचे उमेदवार दलित मित्र गणेशराव वाघमारे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत बबनराव थोरात यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी प्रभाग क्रमांक 10 मध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार अर्जित चव्हाण यांच्या प्रचारासाठी तानाजी नगर येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उपनेते बबनराव थोरात यांनी परिसरातील विविध नागरी समस्या जाणून घेतल्या. या प्रचारात आबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही पदयात्रांमध्ये ज्येष्ठ नेते धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, बबन बारसे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, नितीनराव वाघमारे, प्रदीप चव्हाण, शहर प्रवक्ते नागनाथ माधापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे सेनेच्या सर्व पदाधिकार्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत, प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार गणेशराव वाघमारे व प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार अर्जित चव्हाण यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

COMMENTS