Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषदेच्या निवडणुकीवर ठाकरे गटाचा आक्षेप

आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत

मुंबई ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अपात्र आमदारांना मतदान करता येणार नाही, याविर

लासलगांव विंचूर सह 16 गाव पाणी पुरवठा प्रश्न गंभीर पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा   
महापुरूषांनी स्वसामर्थ्यावर शाळा सुरू केल्या !
राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू :मंत्री अशोक चव्हाण

मुंबई ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अपात्र आमदारांना मतदान करता येणार नाही, याविरोधात ठाकरे गट या निवडणुकीवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. मात्र आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक घेणे हे घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.
विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची गुरूवारी बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे. जर याचिका दाखल केली तर विधान परिषद निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते. विधानसभेच्या निवडणुकात तोंडावर असताना विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरु असतानाच या नव्या मुद्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, अजित पवार गटाच्या 40 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही काही निरीक्षणे नोंदवली आहेत. हे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची भूमिका न्यायालयाची आहे. अशावेळी जे आमदार अपात्र ठरू शकतात आणि सर्वोच्च न्यायालयात यावर खटला सुरू आहे त्यांनी मतदान करून विधानपरिषदेचे आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य आहे. त्यांना हा अधिकार नाही. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. ही निवडणूक घटनाबाह्य असून बेकायदेशीर आहे, याला स्थगिती द्यायला पाहिजे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

COMMENTS