नवी दिल्ली : जगात आतापर्यंत झालेल्या सर्व दहशतवाद्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पाकिस्तानचा संबंध राहिला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे केंद्र नष

नवी दिल्ली : जगात आतापर्यंत झालेल्या सर्व दहशतवाद्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पाकिस्तानचा संबंध राहिला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे केंद्र नष्ट करणे जरूरीचे होते, त्यामुळेच पाकिस्तानच्या थेट दहशतवादी केंद्रांवर हल्ले करत दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. संध्याकाळी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले. आज मी त्यांचे शौर्य, धाडस आणि शौर्य आपल्या देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला समर्पित करतो. ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवाद्यांच्या केंद्रांवर हल्ला केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी थेट शाळा, कॉलेज, तसेच नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हल्ला भारताने परतवून लावला. भारताच्या या प्रत्युत्तराने पाकिस्तानची पुरती निराशा झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओशी संपर्क केला, आणि पाकिस्तानने बचावात्मक पवित्रा घेत युद्ध थांबवण्याची मागणी केली. तसेच यापुढे दहशतवाद्यांना आश्रय देणे, आणि हल्ले करणार नसल्याचे सांगितल्याने भारताने देखील युद्धविराम दिला. मात्र यापुढे पाकिस्तानने हल्ले केल्यास त्यांना कठोर प्रत्युत्तर देवू. आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना कधीही माफ करणार नाही. ही वेळ युद्धाची नाही, तसेच ही वेळ दहशतवाद्यांची देखील नाही. पाकिस्तानचे सरकार ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना आश्रय देत आहे, तेच दहशतवादी एके दिवशी पाकिस्तानला घेवून डुबेल, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. युद्ध आणि व्यापार, एकाचवेळी सुरू राहणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानसोबतच पुढे कोणताही व्यापार करणार नसल्याचे संकेतच पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
पुन्हा हल्ला केल्यास कठोर कारवाई करू
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे, की यापुढे पुन्हा हल्ला केल्यास यापेक्षाही कठोर कारवाई करू. तसेच पाकिस्तानने अणुवस्त्राची धमकी देवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा यापेक्षाही कठोर कारवाई करू, असा इशाराच पंतप्रधान मोदी यांनी थेट पाकिस्तानला दिला आहे.
ऑपरेशन सिंदूर कोट्यावधींच्या भावनांचे प्रतिबिंब
ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही तर ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे रोजी रात्री उशिरा आणि 7 मे रोजी पहाटे, संपूर्ण जगाने हे आश्वासन परिणामात रूपांतरित होताना पाहिले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण जेव्हा देश एकजूट असतो, राष्ट्र प्रथम या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वोच्च असते, तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS