पुंछ प्रतिनिधी : जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. येथे एक बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला
पुंछ प्रतिनिधी : जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. येथे एक बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. ही बस पुंछमधील सौजियाहून मंडी येथे जात होती. या बसमध्ये 36 प्रवासी प्रवास करत होते. ही बस सौजियाच्या सीमावर्ती भागातील बरारी नाल्याजवळ आली आणि दरीत कोसळली. या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू केल. या अपघातात जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
COMMENTS