Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटील कुटूंबावर गंभीर आरोप करत तेरच्या भाजप जिल्हा चिटणीस ज्योत्सना लोमटेंचा राजीनामा 

धाराशिव प्रतिनिधी - धाराशिव तालुक्यातील तेर हे डॉ. पद्मसिंह पाटील यांची जन्मभूमी यामुळे राजकीय महत्व आहे. याच गावचे माजी सरपंच पांडूरंग

निवडणूक विभागामार्फत ’अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला बेदाम मारहाण करत तोडफोड | LOKNews24
तालुकाप्रमुखाचे पद काढल्याने पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

धाराशिव प्रतिनिधी – धाराशिव तालुक्यातील तेर हे डॉ. पद्मसिंह पाटील यांची जन्मभूमी यामुळे राजकीय महत्व आहे. याच गावचे माजी सरपंच पांडूरंग बगाडे यांच्या कन्या व सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्सना लोमटे यांनी  आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. जानेवारीच्या सामाजिक कार्यक्रमाच्या विषयावर आज चर्चा व दोन वर्षापुर्वीही सक्षणा सलगर व अर्चना पाटील उपस्थित असताना का आक्षेप नव्हता यावर बोलताना तेव्हा आम्ही सर्व राष्ट्रवादीत होतो, असे सांगितले. पण २०१९ म्हणजे ४ वर्षापुर्वीच राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश करून आमदार झाले आहेत. ४० वर्ष डॉ. पद्मसिंह पाटील व राणा पाटील यांच्या सोबत राहून वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या व पदे भोगली. मात्र आत्ताच काय झाले की, ज्यासाठी सलगर यांच्या नावाचा सहारा घेतला जात आहे. पक्षप्रवेश कोणत्या पक्षात करणार असल्याचे विचारता लोमटे म्हणाल्या की, पुढील दिशा ठरलेली नाही. सद्या कुठल्याच पक्षप्रवेशाचा विचार केला नसून याबद्दल पुन्हा तुम्हाला सांगते, असे लोमटे म्हणाल्या.

COMMENTS