नगरच्या साईबन शिवारात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या साईबन शिवारात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराजवळील एमआयडीसी परिसरात असलेल्या साईबनजवळ असलेल्या ओढ्यात शेळी चारण्यासाठी आलेल्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची संत

आचारसंहितेचा फटका, झेडपी भरती लांबणीवर ?
मंदिरांच्या माध्यमातून ऋणानुबंध जोडले जातात – राज्यमंत्री आदिती तटकरे
नगरमध्ये हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराजवळील एमआयडीसी परिसरात असलेल्या साईबनजवळ असलेल्या ओढ्यात शेळी चारण्यासाठी आलेल्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. नगरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या साईबनजवळील ओढ्यात शेळी चारण्याकरीता गेलेल्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने पाशवी अत्याचार केला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने तिच्या आईस या घटनेबाबत सांगितले. मुलीने ही घटना सांगितल्यानंतर आईने तडक एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगर एमआयडीसी पोलिसांनी मस्तराम (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात 376 (2), बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.

COMMENTS