रांची/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून, मंगळवारी भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी

रांची/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून, मंगळवारी भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी 10 नक्षलवाद्यांना अटक केली असून, या 10 पैकी 5 नक्षलवादी विजापूर जिल्ह्याचे आहेत. त्यांच्याकडून ट्रॅक्टर कॉर्डेक्स वायरसह सुमारे 500 डिटोनेटर्स जप्त करण्यात आलेत. ही एवढी मोठी स्फोटके बड्या नक्षलवादी नेत्यांकडे नेली जात होती. त्यांचा छत्तीसगड किंवा तेलंगणात सर्वात मोठा नक्षलवादी हल्ला करण्याचा डाव होता. पण पोलिसांनी वेळीच तो हाणून पाडला.
तेलंगणा पोलिसांना एका खबर्याकडून माहिती मिळाली होती की, नक्षलवादी संघटनेचे काही सदस्य मुलकानापल्ली व दुमुगुडेम मंडळांम मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह दडून बसलेत. त्यानुसार, भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी दुमुगुडेम व सीआरपीएफच्या 141 व्या बटालियनच्या जवानांचे संयुक्त पथक घटनास्थळी रवाना केले. परिसरातील गावे व त्यालगतच्या जंगलात शोधमोहीम राबवून 10 संशयितांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 1 ट्रॅक्टर, 1 बोलेरो कार व 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या वाहनांची झडती घेतली असता त्यात 10 नक्षलवाद्यांसह एका ट्रॅक्टरमधून सुमारे 90 बंडल कॉर्डेक्स वायर, 500 डिटोनेटर व इतर स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली. चौकशीत 5 नक्षली तेलंगणातील विजापूर जिल्ह्यातील अवापल्ली भागातील, तर 5 छत्तीसगडमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. गत अनेक वर्षांपासून हे नक्षलवादी संघटनेसाठी काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झालेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दारुगोळ्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. पण ही स्फोटके कुठून आली, याचा खुलासा अद्याप झाला नाही. लवकरच या पुरवठा साखळीचा पर्दाफाश केला जाईल, असे अधिकार्यांनी स्ष्ट केले आहे. कॉर्डेक्स वायरचा वापर माओवाद्यांकडून आयईडी स्फोट करण्यासाठी केला जातो. रस्त्यावर आयईडी पेरल्यानंतर माओवादी कॉर्डेक्स वायरच्या मदतीने स्फोट करतात. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये समय्या (36), रा. वारंगल जिल्हा, आरेपल्ली श्रीकांत (23), रा. वारंगल जिल्हा, मेकाला राजू (36), रा. वारंगल जिल्हा, रमेश कुम (28), रा. वारंगल जिल्हा, सल्लापल्ली (25), रा. वारंगल जिल्हा, मुशिकी रमेश (32), रा. विजापूर जिल्हा, सुरेश (25), रा. विजापूर जिल्हा, बडिसा लालू (22), रा. विजापूर जिल्हा, सोडी महेश (20), रा. विजापूर जिल्हा, माडीवी चेतू (21), रा. विजापूर जिल्हा, यांचा समावेश आहे.
COMMENTS