Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसिलदार सतिश कदम यांनी अर्थशास्त्रात पीएच. डी.

कराड / प्रतिनिधी : रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन शाखेचे तहसिलदार सतिश पांडुरंग कदम यांनी नुकतीच श्री शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अ

अनैतिक संबंधांत अडसर ठरणार्‍या बालकाची प्रियकराच्या मदतीने आईनेच संपवले
फलटण नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण; स्थानिक नागरिकांचा उपोषणाचा इशारा
फसवणूक करून हडपलेली जमीन सरकार जमा: प्रांताधिकारी कट्यारे यांचा ऐतिहासिक निकाल

कराड / प्रतिनिधी : रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन शाखेचे तहसिलदार सतिश पांडुरंग कदम यांनी नुकतीच श्री शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र या विषयातील पीएच. डी. प्राप्त केली आहे. यासाठी अर्थशास्त्र विषयातील संशोधनात्मक कार्याचे गाढे अभ्यासक धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथील बँक व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजय कुंभार यांनी कदम यांना गाईड म्हणून मार्गदर्शन केले आहे.
त्याचबरोबर श्री शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले, प्रा. डॉ. महादेव देशमुख, प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांचे कदम यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे.
कदम हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी आहेत. आई मिनाक्षी आणि स्वर्गवासी वडील पांडुरंग कदम यांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान या निमित्ताने कदम यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाची व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पीएच.डी. चे कामकाज करत असताना पत्नी सौ. निर्मला कदम यांनी त्यांना मोलाची साथ दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सतिश कदम यांचे प्राथमिक शिक्षण कराड नगरपरिषद शाळा क्र. 8 येथे तर माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल, कराड येथे झाले. त्यानंतर वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथून अर्थशास्त्र विषयातील पदवी (बीए) संपादन करून नंतर त्यांनी सन 2001 मध्ये सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथून अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (एमए) संपादन केली. या परीक्षेत त्यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आता तब्बल 21 वर्षांनी त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. शासकीय सेवेतील व व्यक्तिगत आयुष्यातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शासकीय सेवा भावना जपत, कर्तव्यभावना जपत तहसिलदार सतिश कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सतिश कदम हे शासकीय सेवेत नोव्हेंबर 2002 मध्ये नायब तहसिलदार म्हणून रुजू झाले आहे. ऑक्टोबर 2018 पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे तहसिलदार (पुनर्वसन) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई (शहर) या ठिकाणी शासकीय सेवा बजावली आहे. कदम हे सावंतवाडी येथे तहसिलदार म्हणून कार्यरत असताना सन 2016-17 या महसुली वर्षात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल 1 ऑगस्ट 2017 या महसूल दिनी त्यांचा तत्कालीन सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.

COMMENTS