तहसीलदार सकारात्मक ; शेत रस्त्याचा वाद मिटून ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्त्याचा शुभारंभ

Homeकृषी

तहसीलदार सकारात्मक ; शेत रस्त्याचा वाद मिटून ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्त्याचा शुभारंभ

नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला रस्ता गेल्या चार वर्षापासून प्रलंबित होता व पिंपळगाव माळवी येथील शेतक

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा
बिबी धरणाचे काम सुरू; शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण
दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांचे दिवाळे

नगर (प्रतिनिधी)

पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला रस्ता गेल्या चार वर्षापासून प्रलंबित होता व पिंपळगाव माळवी येथील शेतकरी महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले आदी शेतकरी यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेत जमीन पडीक होती.

तहसीलदार संजय शिंदे यांच्याकडे अर्ज करून रस्त्याची मागणीचा पाठपुरावा केला व तहसीलदारांनी सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या बाजूने शेतातून जाण्यासाठी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. मात्र वादीने उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे अपील केली मात्र निर्णय वादींच्या विरोधात गेला व रस्ता खुला करण्याचे आदेश देण्यात आले.

शेतकरी कृषी दिनाचे औचित्य साधून सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता खुला करण्यात आला यावेळी महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले, भगवान भोंदे, नारायण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव, निर्मला भोंदे, तलाठी सागर ठोंबरे, तलाठी नितिन काळे, कोतवाल दळवी मॅडम, सागर भोंदे, शुभम भोंदे, दादासाहेब भोंदे, रेणुबाई भोंदे आदीसह पोलीस व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार संजय शिंदे यांच्या वतीने सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या पुढाकाराने चार वर्षापासून बंद असलेला शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठीचा रस्ता खुला करून देऊन रस्त्याचे कामाचे शुभारंभ देखील करण्यात आले व ग्रामस्थांनी सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांचा सत्कार केला.

COMMENTS