शेवगाव तालुका ः शहरातील विकृत मनोवृत्तीच्या एका वेडसर युवकाकडून महिलांची छेड काढणे, व्यापारी व्यावसायिकांना त्रास देणे, जीवे मारण्याची धमकी देणे

शेवगाव तालुका ः शहरातील विकृत मनोवृत्तीच्या एका वेडसर युवकाकडून महिलांची छेड काढणे, व्यापारी व्यावसायिकांना त्रास देणे, जीवे मारण्याची धमकी देणे वारंवार अशाप्रकारचे वारंवार कृत्य करून लोकांना वेठीस धरणार्या इसमावर पोलिसाकडून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि1) शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
याबाबत समजेली माहिती अशी की, शहरातील या वेडसर युवकाने रविवारी सायंकाळी येथील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी चौकात दोन मुलींची छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत तक्रार देण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस निरीक्षकांनी तो वेडा आहे. तक्रार घेता येणार नाही असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस प्रशासनाच्या उरफाट्या कामकाज पद्धतीच्या निषेधार्थ सोमवारी शहरबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी पुकारण्यात आलेल्या शहरबंद आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहिल्याने नाथषष्टी उत्सवाच्या काळात ग्रामस्था बरोबरच यात्रेकरूंना विविध समस्यांचा सामना करावा लागला सदर मनोरूण युवकाने मागील महिन्यात शहरातील एका डॉक्टर वर धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आजचा प्रसंग घडला नसता असे अनेकानी सांगितले.
COMMENTS