Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई : साऊथ अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'सालार'चे टीझर रिलीज झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नीलने केले आहे.

काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण
कोल्हापुरात तिघांचा बुडून मृत्यू
एस.एस.जी.एम.कॉलेज ‘नॅक’ साठी सज्ज

मुंबई : साऊथ अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘सालार’चे टीझर रिलीज झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नीलने केले आहे. ‘सालार’ चित्रपटाचा टीझर हा प्रेक्षकांना फार आवडला आहे. तसेच या चित्रपटाचा टिझर हा फार जबरदस्त असून या टिझरमध्ये प्रभास हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. ‘सालार’ चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला टीनू आनंद हा गाडीवर बसलेला दिसत आहे. त्यानंतर प्रभासचा चेहरा ब्लर दाखविल्या गेला आहे तो या टिझरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शनमध्ये काही लोकांना मारत आहे. त्यानंतर त्याच्या चेहरा स्पष्ट दाखविण्यात आला आहे. या टिझरमध्ये प्रभास हा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘सालार’चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटाचा टिझर सकाळी 5 वाजता 6 जुलै 2023 रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त श्रृती हासन, जगपती बाबू, पृथ्वीराज सुकुमारन, श्रिया रेड्डी आणि ईश्वरी राव देखील असणार आहेत.

प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ या चित्रपटाची डेट टिझरमध्ये जाहिर करण्यात आली आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, मल्याळम, तामिळ, कन्नड, आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सालार’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितले आहे की, ‘सालारचा टीझर आऊट झाला आहे. तुम्ही अजून पाहिलात की नाही’ असे त्याने लिहले आहे. प्रभासच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या कमेंट येत आहे. एका चाहत्याने पोस्टला लाईक करत लिहले, बॉक्स ऑफिसचा राजा, प्रभास अण्णा कमबॅक तर दुसऱ्या चाहत्याने लिहले, की तू भारतीय बॉक्स ऑफिसवर पुन्हा राज्य करशील. तसेच ‘सालार’च्या टीझरला युट्यूबवर अल्पावधीतच दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही मात्र प्रभास हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडेल हे येणाऱ्या काळात समजेल

COMMENTS