Homeताज्या बातम्यामनोरंजन

हृतिक रोशन- दीपिकाच्या ‘फायटर’ चा टीझर रिलीज

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबा

अमृता फडणवीसांचा सापासोबत फोटो
आरटीओ एजंटची हत्या l
काश्मीर फाईल्स चित्रपटात सत्य लपवण्यात आलं , पण तो सिनेमा आहे | LOKNews24

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘फायटर’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा रोमांचक आणि धमाकेदार टीझर रिलीज केला. टीझर पाहून हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर असणार असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या लव्ह केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधलं. फायटर चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनिल कपूरही जबरदस्त स्टाईलमध्ये दिसणार आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एअरफोर्स ऑफिसर म्हणून आकाशात फायटर प्लेनसह जबरदस्त स्टंट करताना दिसत आहेत. या टीझरमध्ये अनिल कपूरही एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा हा टीझर देशभक्तीच्या भावनेने भरलेला आहे. जे पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

COMMENTS