Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॉडविन कप 2025 फुटबॉल स्पर्धेत संघांची दमदार खेळी

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केली जाणारी गॉडविन कप 2025 ही प्रतिष्ठ

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1339 कोटी रुपयांचा निधी मंजूर : ना. मकरंद पाटील
पेन्शनर्सना नियमाप्रमाणे हक्क मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची : आनंद भंडारी
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन
Displaying MIR_6134.JPG

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केली जाणारी गॉडविन कप 2025 ही प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा भुईकोट किल्ला येथील मैदानावर उत्साहात रंगली आहे. फुटबॉल खेळाडूंना चालना, प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने, जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि डिक परिवाराच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भुईकोट किल्ला परिसरात तरुण खेळाडूंच्या कौशल्य, रणनीती आणि जोशाला रंगत आलेली पाहायला मिळत असून, पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांची मोठी उपस्थिती उत्साहात भर घालत आहे.
राठोड एफसीचा डॉन बॉस्को स्कूलवर 8-0 असा धडाकेबाज विजय झाला. राठोड एफसी संघाने अप्रतिम खेळ दाखवत डॉन बॉस्को स्कूल संघावर 8-0 असा एकतर्फी विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत राठोडच्या आघाडीपटूंनी प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी न देता एकहाती वर्चस्व स्थापित केले.
गुलमोहर एफसी आणि फिरोदिया शिवाजीयन्स (बी टीम) यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी बचाव आणि आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर समसमान खेळ करत शेवटपर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही. सामना गोलशून्य बरोबरीत संपल्यानंतर निकाल टायब्रेकरवर लागला आणि यात गुलमोहर एफसीने विजयाची नोंद करत पुढील फेरीत प्रवेश निश्‍चित केला.
तिसऱ्या रोमांचकारी सामन्यात सुमन एफसी आणि राठोड एफसी यांच्यात सामना तितकाच रंगला. दोन्ही संघांनी कौशल्यपूर्ण खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. या सामन्यात सुमन एफसीने एक महत्त्वाचा गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. विजय संपादन करुन राठोड एफसी, गुलमोहर एफसी आणि सुमन एफसी या विजयी संघांनी स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे.

COMMENTS