नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली. या मालिकेत भारता
नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली. या मालिकेत भारताचा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करत त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. दरम्यान या मालिकेनंतर त्याला आयसीसीकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. रवी बिश्नोई हा टी-२० क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज बनला आहे. या यादीत त्याने राशिद खानलाही मागे सोडलं आहे. रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार खेळ केला. ५ टी-२० सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर तो टी-२० गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. रवी बिश्नोईला गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. रवी बिश्नोई देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान संघाचं प्रतिनिधित्व करतो. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ४-१ ने धूळ चारली होती. रवी बिश्नोईबद्दल बोलायचं झालं तर त्याने २१ टी-२० सामन्यांमध्ये ३४ गडी बाद केले आहेत. युवा फिरकीटपटू रवी बिश्नोईने अनुभवी गोलंदाज रवी बिश्नोईला मागे सोडलं होतं. मुख्य बाब म्हणजे रवी बिश्नोई हा आयसीसीच्या टॉप १० गोलंदाजांच्या यादीत एकमेव गोलंदाज आहे. रवी बिश्नोईने ६९९ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थान गाठलं आहे. तर राशिद खान ६९२ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे.आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमार यादव आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याचे रेटिंग पॉईंट्स ८५५ आहेत. तर आता रवी बिश्नोईने देखील अव्वल स्थान गाठलं आहे.
COMMENTS