टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तान संघाने भारताचा पाच गडी राखून पराभव करत मागील पराभव
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तान संघाने भारताचा पाच गडी राखून पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. दुबईत ४ सप्टेंबरला संध्याकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) ने पत्रकार परिषदेत पराभवाचे मोठे कारण सांगितले आहे.
भारताकडून पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली सर्वाधिक 44 चेंडूत 60 धावा केल्या. अखेरच्या षटकात विराट कोहलीची विकेट पडली. त्याच्या 60 धावांच्या जोरावर भारतीय संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावांपर्यंत मजल मारू शकला. सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, नाणेफेक हरलेल्या टीम इंडियाची योजना स्कोअर बोर्डवर एकूण 200 प्लस जोडण्याची होती. यासाठी चांगली सुरुवात झाली, पण मधल्या फळीत निराशाजणक कामगिरीमुळे ते झाल नाही. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या केवळ 40 धावा जोडून डगआउटमध्ये परतले. आमचा स्कोअर 200 प्लस असता तर आम्ही जिंकू शकलो असतो. पण आम्ही त्या लक्ष्याच्या 20-25 धावांनी मागे पडलो.
COMMENTS