Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : आ. थोरात

संगमनेर : स्पर्धेच्या युगात दर्जेदार विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग क

संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे
शिंदे शिवसेना अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी मोहसीन सय्यद
करंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय

संगमनेर : स्पर्धेच्या युगात दर्जेदार विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून प्रयोगशील विद्यार्थी घडवून शैक्षणिक क्रांती केली पाहिजे, असे प्रतिपादन कॉग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी राजापूर येथे केले. भास्कर गंगाधर मोहिते यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत हे होते.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे माजी जि. प. सदस्य रामहरी कातोरे, शेतकी संघाचे उपाध्यक्ष सुनील कडलग मा पं स सदस्य विष्णू रहाटळ , अशोक सातपुते , संजय गांधी निराधार योजनेचे मा तालुकाध्यक्ष माधवशेठ हासे, शिक्षक नेते संजय धामणे ,अनिल आंधळे हे उपस्थित होते. पुढे बोलताना आ थोरात म्हणाले कि, आज शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. ते पेलवण्याची क्षमता शिक्षकांनी आत्मसात केली पाहिजे . मोहिते परिवार हा पुरोगामी विचाराची बांधिलकी जपणारा परिवार आहे आई- वडील विडी कामगार असूनही दुरदुष्टी व शिक्षणाबद्दल आस्था व जागृती त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटूंबाला त्यांनी शिक्षीत केले. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला लोक सहजा सहजी जात नाही परंतु आजची गर्दी पाहता. भास्कर मोहिते यांच्या शैक्षणिक व चांगल्या स्वभावाची प्रचिती येते. सामाजिक चळवळीत या परिवाराचे फार मोठे योगदान आहे. त्यांची पुढची पिढी हा विचाराचा वारसा पुढे नेत आहे हे कौतुकास्पद आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात समरस होणारा समाजा प्रति आस्था असणारा व पुरोगामी विचाराची सामाजिक बांधिलकी जपणारा हा परिवार आहे भास्कर मोहिते यांचे शैक्षणिक व सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान आहे.सूत्रसंचालन अक्षय खतोडे यांनी तर आभार सुखदेव मोहिते यांनी मांडले कार्यक्रमास शिक्षक नेते शिवाजी दुशिंग अनिल आंधळे, शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहिंज, माजी चेअरमन किसन खेमनर, राजू रहाणे राजेंद्र भालारे केंद्रप्रमुख अशोक आवारी बाळासाहेब जाधव, नंदा वलवे, रोहिणी खतोडे, भारत शेलकर सरपंच कुसुम पानसरे अ‍ॅड. अनिल गोडसे, सिताराम सावंत प्राचार्य पंढरीनाथ पथवे, मा प्राचार्य जिजाबा हासे, योगेश हासे, वसंतराव देशमुख , विजय हासे, सुनील हासे, हिम्मत मोहिते, राम मोहिते, प्रदिप काशिद विकास मोहिते, अजय हासे, संदीप हासे, सोमनाथ सोनवणे, रविंद्र धाकतोडेअशोक सोनवणे, अमोल साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते

COMMENTS