Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनौपचारिक परीक्षेची मराठवाड्यातील शिक्षकांना भीती

8 हजारांपैकी केवळ 977 शिक्षकांची उपस्थिती

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी शिक्षकांची एक अनौपचारिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 99 टक्के शिक्षकांनी दांडी मारली.

 भाजपाचा निवडुण येण्याचा रेट इतरांपेक्षा जास्त आहे – उपमुख्यमंत्री
औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? | LokNews24
विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपले

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी शिक्षकांची एक अनौपचारिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 99 टक्के शिक्षकांनी दांडी मारली. जेमतेम 1 टक्का शिक्षकांची उपस्थितीतून शिक्षक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट झाले. मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयाने ही परीक्षा घेतली. जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा शिक्षणाचा आणि शिकवण्याचा स्तर वाढवा यासाठी ही परीक्षा होती. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारांवर शिक्षक आहेत. प्रत्यक्षात अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर होते. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
अवघा एक टक्का पेक्षा कमी शिक्षक या परीक्षेला उपस्थित आहेत. संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारावर शिक्षक आहेत. मात्र त्यापैकी अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मराठवाड्यातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी हे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा होती. शिक्षकांच्या शिक्षणाचा शिकवण्याचा स्तर वाढावा यासाठी या परीक्षेचा आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र या परीक्षेला अनेक शिक्षक संघटनांचा विरोध केला होता. मराठवाड्यात 23 हजार शिक्षकांनी या परीक्षा द्यायची तयारी दर्शवल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. आता नक्की किती शिक्षकांनी परीक्षा दिली हे परीक्षा झाल्यावरच कळेल.

COMMENTS