Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीसह मुलाची हत्येनंतर शिक्षकाची आत्महत्या

बार्शी / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षकाने पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केली. अतुल सुमंत मुंड

भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्या मुलीने आत्महत्या केली
हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

बार्शी / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षकाने पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केली. अतुल सुमंत मुंडे असे आत्महत्या करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. मुंडे पती-पत्नी दोघेही शिक्षक होते. मुंडे यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सुमंत मुंडे (वय 40), तृप्ती अतुल मुंडे (वय 35) ओम सुमंत मुंडे (वय 5) या तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अतुल मुंडे यांनी आधी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. अतुल मुंडे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा तपास आहेत.

COMMENTS